शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:31 IST

नाशिक : २०१५ मध्ये बंदी घातलेला एमडी हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि़१६)पहाटे पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली़ रणजित गोविंदराव मोरे (३२,रा़२०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघांची नावे आहेत़

ठळक मुद्देयुनिट एकची कारवाई : तिघांना संशयितांना अटकएमडी ड्रगसह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : २०१५ मध्ये बंदी घातलेला एमडी हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि़१६)पहाटे पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली़ रणजित गोविंदराव मोरे (३२,रा़२०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघांची नावे आहेत़ त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़

शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना मुंबईहून टाटा सफारी वाहनातून (एमएच १५, ईक्यु ५००५) एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पाथर्डी फाट्यावरील रायबा हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वाघ यांनी पोलिसांच्या दोन टीम तयार केल्या़ सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकिर शेख, पोलीस हवालदार पांडव, पोलीस नाईक दिलीप मोंढे, पोलीस शिपाई विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, शांताराम महाले, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, हेमंत कपिले शेख जाकीर अमजाद हुसेन यांचा समावेश असलेल्या पथकाने रात्री एक वाजेपासून परिसरात सापळा लावला़

रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणारी संशयित सफारी (एमएच १५, ईक्यु ५००५) वाहन जात असताना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला़ या वाहनाचा पाठलाग करून हॉटेल रायबाजवळ पकडून या तिघांना ताब्यात घेतले़ पथकान संश्यितांची अंगझडती घेतली असता संशयित रणजित मोरे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, संशयित पंकज दुंडे याच्याकडे ९० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व दोन मोबाईल तर तिसरा संशयित नितीन माळोदे याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळून आला़ पोलिसांनी ड्रग्ज, मोबाईल व सफारी गाडी असा १५ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र बागूल यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे .संशयितांकडून उडवा-उडवीची उत्तरेगुन्हे शाखेने अटक केलेल्या या तिघांची कसून चौकशी सुरू केली़ संशयितांना एमडी ड्रग्ज कोठून आणले, कोणाला विक्री केले जाणार होते याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ दरम्यान, नाशिक शहरातील कॉलेजरोड परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची विक्री केली जात असल्याचे समोर आले असून काही वर्षांपुर्वी कॅनडा कॉर्नर परिसरात एका तरुणीचा चालत्या वाहनातून बाहेर ढकलण्यात आले होते़ या तरुणीने एमडी ड्रग्जची नशा केल्याचे समोर आले होते़एमडी २ हजार रुपये ग्रॅम

पोलिसांनी जप्त केलेल्या या एमडी ड्रग्जी प्रतिग्रॅम दोन हजार रुपये किमत लावली असली तरी बाजारात यापेक्षा अधिक चढ्या दराने ते विकले जाते़ पोलिसांनी ड्रग्ज जप्त केल्यानंतर तत्काळ न्याय प्रयोग शाळेच्या वैज्ञानिक सहाय्यक प्रतिमा गोसावी यांना पाचारण करण्यात आले होते़ त्यांनी जप्त केलेले एमडी ड्रग्ज असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगून प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमूने ताब्यात घेतले आहेत़

टॅग्स :NashikनाशिकDrugsअमली पदार्थPoliceपोलिसraidधाड