शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पंचवटीतून साडेतीन लाखांचा ‘पॉपीस्ट्रॉ’ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:30 IST

नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाडी रोड) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ४७ हजार ३०० रुपये किमतीचा १०२ किलो पॉपिस्ट्रॉ अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे गुन्हे शाखेची कारवाई : १०२ किलो पॉपीस्ट्रॉ दोन संशयितांना अटक ; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाडी रोड) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ४७ हजार ३०० रुपये किमतीचा १०२ किलो पॉपिस्ट्रॉ अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे़

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे पॉपीस्ट्रॉ या अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दुपारी चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून संशयित सुरेंद्र पालसिंग यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर नाग चौकातील रतन सुभाष मोराडे हादेखील पॉपीस्ट्रॉची विक्री करीत असल्याचे सांगितले़ त्यानुसार या दोघांच्याही घरी पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ ७० किलो पॉपीस्ट्रॉ व पॉपिस्ट्रॉपूर्वीचा ३२ किलो कच्चा माल असा १०२ किलो अमली पदार्थ जप्त केला़

गुन्हे शाखेने या दोघा संशयितांकडून जप्त केलेला पॉपीस्ट्रॉ सील केला असून, त्याचे नमुनेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी सीलबंद केले आहे़ अमली पदार्थांच्या बाजारात पॉपीस्ट्रॉ हा चार हजार रुपये किलोने विक्री केला जातो तर कच्चा माल दोन हजार रुपये किलोने विक्री केला जातो़ पंचवटी पोलिसांनी पकडलेल्या गांजाप्रमाणे पॉपीस्ट्रॉ विक्रीचेही मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या दोघांवरही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़

पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस अधिकारी बी़ बी़ पालकर व पथकाने ही कारवाई केली़संशयित सुरेंद्र पाल सिंगसंशयित रतन मोराडे

टॅग्स :NashikनाशिकDrugsअमली पदार्थPoliceपोलिसraidधाड