शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 14:48 IST

नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मात्र गुन्हेगारी कृत्यामुळे न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वयोवद्ध कैद्याची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. मुंबईला जाण्यासाठी त्याने रेल्वेचे तिकीटही काढले मात्र रेल्वे पकडण्यापूर्वीच त्याचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

ठळक मुद्देजन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर मंगळवारी तुरुंगातून सुटका

नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मात्र गुन्हेगारी कृत्यामुळे न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वयोवद्ध कैद्याची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. मुंबईला जाण्यासाठी त्याने रेल्वेचे तिकीटही काढले मात्र रेल्वे पकडण्यापूर्वीच त्याचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

मूळचा पश्चिम बंगालमधील वलदा जिल्ह्याच्या कलिया तालुक्यातील मेहराम गावचा रहिवासी असलेला नूर जिआरोस इस्लाम यास न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ बंदी क्रमांक सी-९६९५असलेला नूर इस्लाम हा १० जानेवारी २०१५ पासून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता़ नाशिकरोड कारागृहातून मंगळवारी (दि़०२) सकाळी नूर इस्लामची मुक्तता करण्यात आली होती़ यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचून त्याने नाशिकरोड ते कुर्ला असे तिकीटही काढले़ दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी असलेली ही रेल्वे पकडण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

कारागृहातून सुटलेला नूर इस्लाम हा नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील फ्लॅटफार्म क्रमांक चारवर पडलेला होता़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणीतरी आजारी इसम पडलेला असल्याची माहिती दिल्यानंतर १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ त्याच्याकडे कारागृहातील ओळखपत्र, मुक्तता केल्याचे पत्र तसेच रेल्वेचे तिकीटही आढळून आल्याने त्याची ओळख पटली़ जन्मठेपेतील कैदी असलेला नूर कदाचित आपल्या नातेवाइकांना वा आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता़ मात्र कारागृहातील मुक्ततेनंतर त्याने जीवनातूनही एक्झिट घेतली़शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण

जन्मठेपेची शिक्षा भोगून मुक्तता झालेला नूर इस्लाम याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे़ रेल्वेस्थानकावर काहीतरी आजाराने पडलेला इसम म्हणून रुग्णालयात आणलेल्या नूर इस्लामची कारागृहात वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, याचा उलगडा होणे गरजेचे आहे़

टॅग्स :NashikनाशिकjailतुरुंगCrimeगुन्हाDeathमृत्यू