शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युवक खून प्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचा-यास पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:57 IST

नाशिक : वडीलांच्या सेवानिवृत्तीच्या कागदपत्रे तयार करण्यासाठी मागीतलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी सोमवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ...

ठळक मुद्देइगतपुरी येथील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी गुप्तागांवर मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : वडीलांच्या सेवानिवृत्तीच्या कागदपत्रे तयार करण्यासाठी मागीतलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी सोमवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ३ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती़इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मुरलीधर धोंडू आगविले व आरोपी पुनाजी मेंगाळ हे कामास आहेत़ मेंगाळ याने आगविले यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतरची पेन्शनची कागदपत्रे तयार करण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली होती़ आगविले यांनी ही बाब मुलगा राजू यास सांगितली असता ३ जून २०१४ रोजी तो मेंगाळ यांच्याकडे गेला कशाबद्दल पैसे द्यायचा याचा जाब विचारू लागला़ यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या मेंगाळ याने राजूच्या गुप्तागांवर लाथ मारल्याने राजूचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधन व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजयपाटील व गायत्री पटनाला यांनी साक्षीदार तपासले़ तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश वारे यांची साक्ष महत्वाची ठरली़ घटनेच्या वेळी आरोपी मेंगाळ हा मद्याच्या नशेत असला तरी कोणत्या ठिकाणी लाथ मारल्यानंतर जीव जाऊ शकतो याचे त्याला ज्ञान होते असे निरीक्षण न्यायाधीश मोरे यांच्या सरकारी वकीलांनी लक्षात आणून दिले़ त्यामुळे आरोपीस मेंगाळ यास पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय