शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये औषध फवारणीदरम्यान शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 21:13 IST

नाशिक : कोबीच्या रोपाला औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठ वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़मातोरी, दरी रोड, ता़जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देकोबीच्या रोपाला औषध फवारणी औषधाचा त्रास होऊन शेतक-याचा मृत्यू

नाशिक : कोबीच्या रोपाला औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठ वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़मातोरी, दरी रोड, ता़जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहराजवळील मातोरी-दरी रोडवर निवृत्ती पिंगळे यांची शेती आहे़ या शेतीमध्ये त्यांनी कोबीचे रोप टाकलेले असून दुपारी एक वाजेच्या सुमारास कोबीच्या रोपाला कोडायझन नावाच्या औषधाची फवारणी करीत होते़ रोपावर औषधाची फवारणी करीत असताना त्यांना औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा पोलीस पाटील रमेश निवृत्ती पिंगळे यांनी उपचारासाठी जिल्हा रुगणालयात दाखल केले होते़ त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉग़डे यांनी घोषीत केले़दरम्यान, औषध फवारणीच्या औषधाचा त्रास होऊ लागल्याने पिंगळे यांना उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात करण्यात आली आहे़ तर हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़जी़एम़होले यांनी व्यक्त केली आहे़ पिंगळे यांच्या शरीरात किटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्या आला आहे़ वैद्यकीय अधिकाºयांनी व्हिसेरा राखून ठेवला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीmedicineऔषधंDeathमृत्यू