शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत दोन लाख प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:04 IST

नाशिक : देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये ९ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायालयाने जय्यत तयारी केली आहे़ या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमधील दावा दाखल पूर्व (प्री-लिटीगेशन) व दाखल असे सुमारे दोन लाख प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दिली़ गत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ...

ठळक मुद्देगत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची सुविधा

नाशिक : देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये ९ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायालयाने जय्यत तयारी केली आहे़ या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमधील दावा दाखल पूर्व (प्री-लिटीगेशन) व दाखल असे सुमारे दोन लाख प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दिली़ गत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने सर्वाधिक प्रकरणे निकाली काढले होते़शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी होणाºया लोकअदालतीमध्ये नाशिक महानगरपालिकेचे नऊ हजार ९३५, बँकांमधील एक हजार ३५५, दूरसंचार कंपन्यांचे सहा हजार २००, फायनान्सचे चार हजार ५४९, विद्युत वितरण कंपनीचे सहा हजार १३५, वाहतूक शाखेचे सात हजार तर नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे १८ हजार १२५ दावा दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहे़ याखेरीज मालेगाव तालुक्यातील ६२ हजार दावा दाखल प्रकरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दाखल असलेली दहा हजार प्रकरणेही या लोकअदालतीत ठेवण्यात आली आहे़जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश एस़ एम़ बुक्के व कर्मचारी गत दोन महिन्यांपासून अविरत काम करीत असून, पक्षकारांना नोटिसा बजावण्याचे काम अंतिम चरणात आहे़ गत राष्ट्रीय लोकअदालतीला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला होता़ या लोकअदालतीसाठी पक्षकारांनी अधिक प्रतिसाद दिला आहे़ विशेष म्हणजे यावेळी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या व प्रतिसाद पाहता पक्षकारांच्या वाहनांसाठी जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे़या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवली जावी, या जनजागृतीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत प्रकरणे निकाली निघावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले़

लोकअदालत ही लोकचळवळ

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघणारी प्रकरणे वा दाव्यांमुळे दोन्ही पक्षकारांचा फायदा होतो़ त्यांच्यातील संबंध टिकून राहतात तसेच या निकालास विलंबही लागत नाही़ मात्र, यासाठी दोघांचीही संमती आवश्यक आहे़ लोकअदालत ही आता लोकचळवळ झाली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयाने गतवेळी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता़ निपटारा झालेल्या प्रकरणात फायदा झालेल्या पक्षकारांनी या लोकअदालतीचा चांगला प्रसार केला आहे़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय