शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

10वीच्या विद्यार्थिनीला प्रपोज करणा-या शिक्षकाला चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:25 IST

दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.

इंदिरानगर- दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. सुनील कदम असे वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण(पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे.पीडित विद्यार्थिनीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. दहावीला गेलेल्या मुलीस शाळेची तयारी करण्यास सांगितले असता मी शाळेत जाणार नाही, असे सांगून तिने रडण्यास सुरुवात केली. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूर केली असता तिने नववीचे वर्गशिक्षक सुनील कदम हे शाळेतील मधल्या सुट्टीत अश्लील संवाद साधत जवळ येण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी त्यांना प्रतिसाद देत नसल्यानं त्यांनी नववीत नापास करण्याची धमकीही दिली होती. त्यातच दहावीला तेच वर्गशिक्षक असल्याने मला शाळेत जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे शिक्षक कदम याने 22 एप्रिल 2018 रोजी या मुलीच्या इमो मेसेंजरवर अश्लील मेसेज पाठविला होता. मुलीच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुलीचे आई-वडील, नातेवाईक व काही पालक शाळेत गेले. त्यांनी शिक्षक सुनील कदम यास जाब विचारून बेदम मारहाण केली. त्यानंतर कदम फरार झाला असून, मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी शिक्षक सुनील कदमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अल्पवयीन विद्यार्थिनी ही नववीला असताना वर्गशिक्षक असलेला सुनील कदम शाळेच्या मधल्या सुट्टीत भेटून जवळीक साधून अश्लील संवाद साधण्याबरोबरच 'तू मला खूप आवडते, आल लव्ह यू', असे बोलत असत. याबाबत घरी काही सांगितले तर नववीच्या वर्गात नापास करेल, अशी धमकी देत असे. दहावीलादेखील कदम हेच वर्गशिक्षक असल्याचे कळाल्यानं संबंधित विद्यार्थिनी शाळेत जाण्यास तयार नव्हती. आई-वडिलांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंग