शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 13:13 IST

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये कोरेाना बेड उपलब्ध असल्याने खासगी कोविड सेवा आपण बंद करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, यामागे दुसरं कारण असल्याची चर्चा सुरु आहे.

नेमकं कारण काय?कोरोनाच्या काळात सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आजवर कोरोनावर उपचार करण्यात आले असून, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. गेल्या दीड वर्षापासून खासगी डॉक्टर्स कोरोना रुग्णसेवा करीत असून डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांवर ताणही आला आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याने कोरोना रुग्णांवर तूर्तास उपचार करणार नसल्याचे खासगी रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरेाना संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बऱ्यापैकी बेड उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचार मिळणे शक्य होणार असल्याने यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. निवेदनावर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सचिन देवरे, डॉ. राज नगरकर, डॉ. समीर अहिरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महापौरांनी दिला खासगी रुग्णालयांना इशारानाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिलामध्ये तफावत आढळल्यास थेट रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले होते. वाढीव बिलाबाबत तक्रार असल्यास आता हॉस्पिटल विरोधातील तक्रार थेट महापौरांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. नाशिकमधील अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात महापौर आक्रमक झाले होते. त्यात आता रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करुन न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस