शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:15 IST

जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेड - नाशिक निवडणुकीतील प्रकरण गंभीर आहे. वृत्तपत्र आणि ऐकीव माहितीच्या आधारे हे प्रकरण गंभीर आहे असं मला वाटतं. मूळ उमेदवार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असताना त्यांनी नामांकन अर्ज भरला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे कोरा फॉर्म दिला होता. जर इच्छा असती तर सत्यजितला एबी फॉर्म दिला असता. त्यामुळे हे गंभीर आहे. हा विषय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्याने त्यांना कदाचित यात नेमके काय घडले याबाबत अधिक माहिती असू शकते अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मांडली. 

अशोक चव्हाण म्हणाले की, या प्रकरणाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असेल. या घडामोडीमुळे पक्षाला एक जागा गमवावी लागतेय. त्यामुळे याबाबत दखल घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. बाळासाहेब थोरात आजारी आहेत याची कल्पना आहे. त्यांना दुखापत झाल्याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांची यात भूमिका असेल याच्या निष्कर्षात येणे उचित नाही. मात्र जे काही घडले त्यात पक्षाचं नुकसान झाले आहे. यात अधिकची माहिती बाळासाहेब थोरात घेऊन देऊ शकतात असं चव्हाणांनी म्हटलं. 

तसेच जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे. प्रदेशाध्यक्षांना मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारानुसार ते बोलले आहेत असंही अशोक चव्हाणांनी सांगितले आहे. 

बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही - काँग्रेस सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे