शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अपघातात नाशिकचे चौघे ठार : दोघे गंभीर

By admin | Published: July 16, 2017 10:53 PM

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि.१६) सकाळी अपघात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि.१६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कु टुंबातील दोघा महिलांसह लाखानी कुटुंबातील दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकवरून मुंबईकडे निघालेले हुड्डा कुटुंबीयांच्या इनोव्हा (एम.एच.१५बीयू ९९४) मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून मुंबई-नाशिक लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या समोर उलटली. ट्रकचालकाच्या सदर प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ब्रेक लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये जुने नाशिकमधील वडाळानाका येथे राहणाऱ्या हुड्डा कुटुंबातील दोन महिलांचा मृतांत समावेश आहे. यामध्ये परवीन नसरुद्दीन हुड्डा (५६), आफसिन मोहिद हुड्डा (२५), गुलशन बहादूर लाखानी (५३, शिंगाडा तलाव), बहादूर मुसाभाई लाखानी (५५, शिंगाडा तलाव) असे मयतांची नावे आहेत. तसेच मोटारचालक मोहिद नसरुद्दीन हुड्डा व नसरुद्दीन सदरुद्दीन हुड्डा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अपघातग्रस्त मोटारीच्या मागे या कुटुंबातील दोन मोटारी प्रवास करीत होत्या. पुढील मोटारीचा अपघात झाल्याचे लक्षात येताच तातडीने जखमींना पोलिसांनी पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांच्या मोटारीतून रुग्णालयात तत्काळ रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दोघांचा जागेवर मृत्यू झाला होता. याबाबत अधिक तपास भिवंडी ग्रामीण पोलीस करीत आहेत.