शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नार्वेकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू; मंत्रिमंडळात फेरबदलाच्या दाव्यावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:59 IST

 राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत  यांनी केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना  डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

मुंबई/पुणे : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा असताना ‘विधानसभाध्यक्ष असो वा मंत्री किंवा आमदार म्हणून काम असो; शेवटी काम हे जनतेसाठीच करत राहायचे असते. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. जी माझ्या पक्षाची इच्छा तीच माझी इच्छा,’ असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.  राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत  यांनी केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना  डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.  या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये  नाराज असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभाध्यक्ष म्हणून  संधी देण्यात येणार असून, राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी  काळबादेवी ते गिरगावदरम्यान मेट्रोची तसेच तेथील मार्गाची पाहणी करताना नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. मी माध्यमांतील  बातमीवर विश्वास ठेवत नाही. माझ्या पक्षाची जी इच्छा असेल ती माझी इच्छा राहील.  अध्यक्षपदावर राहून मी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबई आणि नागपूर विधानभवनाचा चेहरामोहरा बदलतोय, अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार म्हणाले, मंगळवारपर्यंत थांबाअजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. असंवेदनशील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी भेटीत दिला. त्यावर पवार यांनी घाडगे यांना मंगळवारपर्यंत थांबा, असे सांगितले.

...तर आनंद कसा होईल?मंत्री झालात तर आपल्याला आनंद होईल काय, असे विचारताच नार्वेकर  म्हणाले, मंत्र्यांपेक्षा  विधानसभा अध्यक्षपद  हे वरचे पद आहे. त्यामुळे मंत्री झालो तर आनंद कसा होईल?   

धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देऊमाजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील गैरव्यवहारासंदर्भात आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचा निर्वाळा दिला आहे. आणखी एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये त्यांचा संबंध नसल्यास पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही वाट पाहत आहोत ! कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे. मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे आणि या सगळ्यासंदर्भात ते काय निर्णय घेतात, याची आम्ही वाट पाहात आहोत, असे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी नागपुरात सांगितले.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र