शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:18 IST

खासदार उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांची मनं जिंकलेली नेते असल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी विविध मुद्द्यांवर आणि व्यक्तींवर भाष्य केलं. राजकारणातील दिग्गजांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोदींचं कौतुक केलं. उदयनराजे यांना देशातील आणि राज्यातील विविध राजकारण्याविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचं ते म्हणाले. त्यांनी लोकांची मनं जिंकली, असंदेखील त्यांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनीदेखील लोकांची मनं जिंकल्याचं उदयनराजे म्हणाले. पुढे मोदींबद्दल हाच प्रश्न विचारताच उदयनराजेंनी तेच उत्तर दिलं. 'मोदींनीदेखील लोकांची मनं जिंकली. जे आहे ते आहे,' असं उदयनराजे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार माझे चांगले मित्र असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पक्षाला राष्ट्रीय राजकारणात गरज असल्याचं ते म्हणाले. तर काँग्रेस अध्यक्ष चार्मिंग आणि हँडसम असून ते नक्कीच चांगलं काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाला संकटात एकसंध ठेवण्याचं काम केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना चिमटा काढला. मिर्झा गालिबनंतर कोण असतील, तर ते आठवले, असा टोला उदयनराजेंनी काढला.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारRahul Gandhiराहुल गांधी