शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 08:57 IST

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजी राजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेतमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत तीन पत्रे  पाठवलीया पत्रांना अजून उत्तर मिळू शकलेले नाही

नवी दिल्ली/मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाता तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती. मात्र या पत्रांना पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही,मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजी राजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत तीन पत्रे  पाठवली आहेत.  महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या या पत्र्यांवर होत्या. मात्र या पत्रांना अजून उत्तर मिळू शकलेले नाही. या संदर्भातील वृत्त टीव्ही नाईन मराठीने प्रसारित केले आहे.दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अ‍ॅटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय़ सरकारने घेतला पाहिजे. अ‍ॅटॉर्नी जनरलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असला पाहिजे. कारण अ‍ॅटॉर्नी जनरल ह सरकारचा माणूस आहे, असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णयजोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. यापुढे आरक्षणाची लढाई ही एक मराठा लाख मराठा या बॅनर खालीच लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन' घटनेप्रमाणे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण 'एसीबीसी' संरक्षित राहावे. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाची वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याकरिता चारही प्रमुख पक्षांच्या कार्यालयासमोर 'आक्रोश आंदोलन' करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र