शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले, "तुझ्यात बघण्यासारखं काय, कपडे काढले तरी…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:06 IST

Narayan Rane Criticize Manoj Jarange Patil: आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक आंदोलन करत असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून भाजपामधील नेत्यांनीही मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांनीही नारायण राणे यांना चार शब्द सुनावले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या टीकेमधून मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील सोलापूरमध्ये मला उत्तर देताना म्हणाले, राणेसाहेब मराठवाड्यात येताहेत तर येऊ दे. आमच्याकडे काय बघणार? आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं आहे काय? असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी विचारला. 

आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. नारायण राणे यांच्या या टीकेमुळे जरांगे पाटील आणि राणे यांच्यातील वाद पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

यावेळी नारायण राणे यांनी त्यांचे कट्टर विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली. आता हे काय करतात, शिव्या देतात. देवेंद्र फडणवीस यांना शिविगाळ केली. पण त्यांनी पलटवार केला का, शिव्या दिल्या का, तर नाही. त्यांच्याकडे सज्जनपणा आहे, सालस आहेत, बुद्धिमत्ता आहे. जनहित, लोकहित, सरकार कसं चालवावं, हे देवेंद्र फडणवीस यांना कळतं. मग आपण शिविगाळ करणाऱ्याच्या नादी का लागावं. उद्धव ठाकरे यांची सध्या चांगली मानसिक स्थिती नाही. मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. त्यामुळे त्यांना काय येतं हे मला माहिती आहे, असे नारायण राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा