शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:27 IST

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहेकुठल्याही पक्षात जाणार नाही, आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनच लढवणार

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून, आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनच लढवणार असल्याचे नारायण राणेंनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज आहेत. दरम्यान, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. आज याबाबत प्रसारमाध्यमांकडून राणेंना विचारणा झाली असता त्यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून, आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवणार आहोत, असे सांगितले. 

यावेळी त्यांच्या भाजपासोबतच्या संबंधांबाबत विचारले असता ''मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही, तर राज्यसभेच्या खासदारकीसाठी भाजपाने आपल्याला पाठिंबा दिला होता.'' असे राणेंनी सांगितले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नेमक्या किती जागा लढवेल, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

काही दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी तोंडसुख घेतले होते. यानंतर भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचाअजेंडा बनविण्याच्या समितीवर घेत चुचकारले होते. यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार अशाही अफवा उठल्या होत्या.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र