शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी फडणवीसांच्या पदराआडून स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, पण अशा बाटग्यांना...; विनायक राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:24 IST

दोनच दिवसापूर्वी राऊत यांनी आपल्या सोशल मिडियावरून राणे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन शिवसैनिक घेऊ देणार नाही. बाटग्याना प्रवेश नाही, अशी टिका केली होती. त्यानंतर मात्र गुरूवारी राणे यांनी स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले यावर राऊत यांनी खुलासा केला.

सावंतवाडी : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदराआडून घेतले आहे. 

त्यामुळे मी इशारा दिला म्हणजे, शिवसेनेत दोन मतप्रवाह असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फडणवीस व दरेकर हे जाणार असल्यानेच शिवसैनिकानी विरोध केला नाही. ते गप्प राहिले, असा युक्तीवाद शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

दोनच दिवसापूर्वी राऊत यांनी आपल्या सोशल मिडियावरून राणे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन शिवसैनिक घेऊ देणार नाही. बाटग्याना प्रवेश नाही, अशी टिका केली होती. त्यानंतर मात्र गुरूवारी राणे यांनी स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले यावर राऊत यांनी खुलासा केला.

'साहेब तुम्ही आज हवे होतात..', नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक

राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळांचे दर्शन हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदरा आडून घेतले आहे. फडणवीस व दरेकर हे जाणार असल्यानेच शिवसेना गप्प राहिली. विरोध केला नाही. या दोघांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे, पण राणे यांनी तो केव्हाच गमवला आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद अशा बाटग्यांना कदापी मिळणार नाही, अेसे राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेत या विषयावरून दोन मते नसल्याचा खुलासा ही त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेचा विरोध मावळला, नारायण राणेंनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शनराणे यांची जनआर्शवार्द यात्रे मुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्ष काय दहा वर्ष चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच त्यांच्याकडे आता विकासांचे कोणते ही प्रश्न राहिले नाहीत, राणे जरी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली, असे म्हणत असले तरी केंद्राने काय चांगले केले ते तरी सांगावे महागाई तसेच डिझेल पेट्रोलचे दर वाढल्याने गरीब जनता त्यात होरपळून गेल्याचे राऊत म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना