Narayan Rane on Shivsena: "एका हातात गम अन् दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन महाराष्ट्रभर लावत फिरा", नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 04:15 PM2021-12-31T16:15:18+5:302021-12-31T16:27:16+5:30

नितेश राणे 'नॉट रिचेबल' झाल्यानंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. त्यावरून राणेंनी त्यांचा समाचार घेतला.

Narayan Rane slammed Shivsena over Posters Banners of Nitesh Rane after winning Sindhudurg Bank Election | Narayan Rane on Shivsena: "एका हातात गम अन् दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन महाराष्ट्रभर लावत फिरा", नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

Narayan Rane on Shivsena: "एका हातात गम अन् दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन महाराष्ट्रभर लावत फिरा", नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

googlenewsNext

Sindhudurg District Central Cooperative Bank Election: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत नारायण राणेंच्या पॅनेलने बाजी मारली. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनेलला ११ जागांवर तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलला ८ जागा मिळाल्या. ही निवडणूक भाजपा विरूद्ध तीन पक्ष अशी रंगवण्यात आली होती, पण मी राजकारणात साऱ्यांना पुरून उरलो आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. या वेळी नितेश राणे यांच्याबाबतीत शिवसेनेने केलेल्या पोस्टरबाजीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

जिल्हा बँकेसंदर्भातील निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचं प्रकरण घडलं. या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपादरम्यान ते 'नॉट रिचेबल' झाले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी 'नितेश राणे हरवले आहेत, त्यांना शोधून दाखवा', अशा आशयाची पोस्टरबाजी केली होती. या संदर्भात नारायण राणेंचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी खोचक शब्दात उत्तर दिले.

"पोलीस यंत्रणा असताना यांनी पोस्टरबाजी केली. एखाद्याला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा असते. पण हे केवळ पोस्टर लावण्याच्या पात्रतेचेच आहेत. राज्यकारभार सांभाळण्याची यांची पात्रता नाही. ना राज्याचा ना बँकेचा.. कोणताही कारभार सांभाळण्याची यां लोकांची पात्रता दिसत नाही. त्यामुळे या लोकांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घ्या आणि महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरा", असा टोला नारायण राणेंनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना लगावला.

दरम्यान, नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही भाष्य केले. देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांची मी लवकरच भेट घेणार आहे. बँकेच्या निवडणुकीदरम्यान पत्रकार मंडळी, पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांच्याबद्दल मला कशाप्रकारचे अनुभव आले, याबद्दल मी त्यांना सर्व माहिती देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलचे विठ्ठल देसाई, महेश सारंग, मनीष दळवी, दिलीप रावराणे, अतुल काळसेकर, बाबा परब, प्रकाश बोडस इत्यादी अकरा उमेदवार विजयी झाले.

Web Title: Narayan Rane slammed Shivsena over Posters Banners of Nitesh Rane after winning Sindhudurg Bank Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.