Narayan Rane in Lilavati hospital: मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 12:44 IST2022-05-27T11:55:59+5:302022-05-27T12:44:49+5:30
नारायण राणे मुंबईमध्ये होते. शुक्रवारी सकाळी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Narayan Rane in Lilavati hospital: मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनरी अँजिओग्राफीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नारायण राणे मुंबईमध्ये होते. शुक्रवारी सकाळी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राणेंवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
नारायण राणेंची अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. यामुळे त्यांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या एक्स-रेसाठी किंवा कोरोनरी अँजिओग्राफीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.