शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये?... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:10 IST

नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र...

ठळक मुद्देनारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही प्रस्ताव आला नाही. तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यानी असे कोणतेही विधान केले नाही

सिंधुदुर्ग -  नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल वेगळीच प्रतिक्रिया दिला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही प्रस्ताव आला नाही. तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यानी असे कोणतेही विधान केले नाही. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. सावंतवाडी येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी चव्हाण म्हणाले, ''नारायण राणे काँग्रेस मध्ये येत आहेत अशी कुठलीही चर्चा नाही. तसेच बाळासाहेब थोरात यांनी नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.'' दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी नांदेड मध्ये चर्चा झाली होती.काँग्रेस बाबत प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले असेल तर दुर्दैवी आहे.आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे.त्यांनी ही चर्चेची तयारी दाखवावी,'' असे चव्हाण म्हणाले. तसेच राज्याला कर्जाच्या खाईत घालण्याचे काम या सरकारने केले आहे.केवळ कोट्यावधी रुपयांच्या घोषणा हे चुनावी जुमले आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी केला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण