शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:00 IST

विधानसभा निवडणूक लढण्यावरुन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ यांना खोचक सल्ला दिला.

Narahari Zirwal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाच्या बैठकीस गैरहजर राहिल्याने ते शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. दुसरीकडे  झिरवळ यांना उमेदवारी घोषित झाल्याने दिंडोरीत बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच नरहरी झिरवळ यांनी मुलगा गोकुळबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत दिसले होते. त्याआधी ते शरद पवार गटाच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना मी शरद पवार यांच्यासोबत आहेत. मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील, असे वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केले होते. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांनी वडिलांविरुद्ध बंड थोपटल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरीमधील जनसन्मान यात्रेदरम्यान नरहरी झिरवाळ यांची दिंडोरीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्याआधी गोकुळ झिरवाळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. याविषयी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मुलाला खोचक शब्दात टोला लगावला आहे.

शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गोकुळ यांच्या उपस्थितीबाबत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं. "त्याने सत्कार करू का असे विचारले होते मी म्हटलो सत्कार कर आणि निघून ये. हा गेला तर गेला याची आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं व्हायचं?," असं नरहरी झिरवाळ म्हणाले. "राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. त्याचे वय पाहता त्याने अजून खूप काही करणं गरजेचं आहे. मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा त्याने स्वतःच काहीतरी करावं. सगळंच बापाचं वापरून कसं चालणार?, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.

तसेच "त्याचा बाप ग्रामपंचायत सदस्यापासून वर जात गेला तेव्हा आमदारपर्यंत पोहचला. बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर तिथून सुरुवात करायला हवी. समजून घेण्यात ५ नाही तर १० वर्ष जातात त्यामुळे त्याने ते उद्योग करू नये," असाही सल्ला नरहरी झिरवाळ यांनी दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNarhari Jhariwalनरहरी झिरवाळAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस