नंदुरबार : बोगस मजुरांच्या नावे ४७ हजारांची मजुरी हडप

By Admin | Updated: August 17, 2016 13:42 IST2016-08-17T13:42:54+5:302016-08-17T13:42:54+5:30

वनविभागाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला

Nandurbar: 47 thousand rupees in the name of bogus laborers | नंदुरबार : बोगस मजुरांच्या नावे ४७ हजारांची मजुरी हडप

नंदुरबार : बोगस मजुरांच्या नावे ४७ हजारांची मजुरी हडप

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. १७ -  वनविभागाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाने २०१५-१६ या कालावधीत ठाणेपाडा, ता.नंदुरबार शिवारात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामे केली होती. सलग समतर चर खोदण्याचे काम करण्यात आले होते. या कामावर मजूर लावण्यात आले होते. वनरक्षक एस.पी.करवंदकर, पी.एल.नगराळे, जावेद अन्वर शेख यांनी हजेरी पट क्रमांक २८५२ मध्ये १० मजुरांचे बनावट नाव कोऱ्या हजेरी पत्रकात टाकण्यात आले. त्यांच्या नावावर ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केला.

चौकशीतही ही बाब निष्पन्न झाल्याने सहायक प्रादेशिक वनरक्षक जयप्रकाश आनंदराव पाटील यांनी फिर्याद दाखल त्यावरून तिघांविरुद्ध गैरव्यवहार केल्याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहे.

Web Title: Nandurbar: 47 thousand rupees in the name of bogus laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.