नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 11:30 IST2023-10-08T11:29:40+5:302023-10-08T11:30:08+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येतील, आवश्यक निधी देण्यात येईल.

नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस
अकोला : खासगी रुग्णालयांतील अत्यवस्थ, नाकारलेल्या व रुग्णालयातून सुटी दिलेल्या काही रुग्णांचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला, ही घटना गंभीर आहे; परंतु त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आरोप करून आरोग्य सेवा कोलमडल्याचे विरोधक राजकीय मंडळींकडून केले जाणारे भांडवल चुकीचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येतील, आवश्यक निधी देण्यात येईल. तसेच, औषध खरेदीचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये औषध नाही आणि आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र भासविण्याचे विरोधकांकडून करण्यात येत असलेले काम चुकीचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.