नांदेडमध्ये कच-यात सापडले जिवंत हँड ग्रेनेड
By Admin | Updated: July 23, 2016 17:12 IST2016-07-23T16:05:19+5:302016-07-23T17:12:04+5:30
नांदेड शहरातील दीपक नगर परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास हँड ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे
नांदेडमध्ये कच-यात सापडले जिवंत हँड ग्रेनेड
>ऑनलाइन लोकमत -
नांदेड, दि. 23 - शहरातील दीपक नगर परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास हँड ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. मिनाबाई भुजागडे यांना कच-यात संशयास्पद वस्तू सापडल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांनी तपासणी केली असता हँड ग्रेनेड असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी निर्मनुष्य ठिकाणी या ग्रेनेडचा स्फोट करुन निकामी केलं आहे. मात्र या ठिकाणी हँड ग्रेनेड आलं कोठून याचा पोलीस तपास करत आहेत.
मिनाबाई भुजागडे यांनी चूल पेटवण्यासाठी नारळाच्या शेंड्या आणि कचरा जमवला होता, यावेळी कचऱ्यात त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. पोलिसांना कळवलं असता पोलीस आण बॉम्बशोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. तपासणी केली असता ही वस्तू हँड ग्रेनेड असल्याचं स्पष्ट झालं. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी निर्मनुष्य ठिकाणी या ग्रेनेडचा स्फोट करुन त्याला निकामी करण्यात आलं.