नांदेड जिल्ह्यात नऊ ग्रामसेवक निलंबित

By Admin | Updated: September 1, 2015 01:04 IST2015-09-01T01:04:55+5:302015-09-01T01:04:55+5:30

पंचायतराज समितीच्या प्रस्तावित दौऱ्याच्या तयारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याची

Nanded district suspended nine Gramsevaks | नांदेड जिल्ह्यात नऊ ग्रामसेवक निलंबित

नांदेड जिल्ह्यात नऊ ग्रामसेवक निलंबित

नांदेड : पंचायतराज समितीच्या प्रस्तावित दौऱ्याच्या तयारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी येथे दिली. पंचायतराज समितीचा १३ सप्टेंबरपासून दौरा आहे. त्याची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दररोज कामांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ३१ आॅगस्टला नायगाव पंचायत समिती कार्यालयात सर्व ग्रामसेवकांची बैठक बोलाविण्यात आली होती. नऊ ग्रामसेवक त्यास कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा वरिष्ठांची परवानगी न घेता अनुपस्थित राहिले. संबंधित ग्रामसेवकांनी बैठकीस अनुपस्थित राहून कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Web Title: Nanded district suspended nine Gramsevaks