नांदायला नकार दिला, म्हणून केला हल्ला!

By Admin | Updated: October 20, 2016 02:10 IST2016-10-20T02:10:18+5:302016-10-20T02:10:18+5:30

संगीता सुर्वे या महिला पोलिसावर चारकोपमध्ये पतीने चाकू हल्ला करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती.

Nandala refused, so did the attack! | नांदायला नकार दिला, म्हणून केला हल्ला!

नांदायला नकार दिला, म्हणून केला हल्ला!


मुंबई : संगीता सुर्वे या महिला पोलिसावर चारकोपमध्ये पतीने चाकू हल्ला करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. याप्रकरणी संगीताने सोबत नांदायला नकार दिला,म्हणून तिच्यावर हल्ला केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
संगीता सुर्वे (२६) यांच्यावर त्यांचा पती प्रीतम अहिरेकर याने जवळपास तेरा वार केले आहेत. ज्यामुळे अद्याप त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रीतम आणि संगीता यांच्या लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांचे एकमेकांशी वाद होऊ लागले. तो संगीता यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याला कंटाळून संगीता वेगळ्या राहू लागल्या. त्यातच अहिरेकर कामावर अनुपस्थिती लागल्याने त्याला नोकरी देखील गमवावी लागली. ज्यात त्याला दारूचे व्यसन लागले. सुरक्षारक्षकाचे काम करून तो स्वत:चा उदरनिर्वाह करू लागला. मात्र नंतर त्याने संगीता यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो त्यांच्या गावी देखील गेला. मात्र नातेवाईकांनीही त्याला टोमणे मारण्यास सुरवात केली. तसेच कोणीही त्याला संगीताचा पत्ता देत नव्हते. त्यामुळे त्याने गावच्या पत्त्यावर कायदेशीर नोटीस पाठवली . संगीताचा चारकोपमधील पत्ता मिळाल्याने त्याने तिच्याकडे धाव घेतली. सोमवारी रात्री तो संगीता राहत असलेल्या सह्याद्रीनगरच्या सदगुरु अपार्टमेंटमध्ये आला. रात्री त्याने एक चाकू विकत घेत पहाटे संगीताच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. (प्रतिनिधी)
>‘पुन्हा नव्याने संसार सुरु करू, अशी विनंती मी संगीताला करायला गेलो होतो मात्र तिने सोबत नांदायला नकार दिला आणि त्या रागाच्या भरात मी तिच्यावर हल्ला केला, असे त्याने चारकोप पोलिसांना दिलेल्या जबाबात अहिरेकरने म्हंटले आहे. त्याला चारकोप पोलिसांनी मंगळवारी स्थानीक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Nandala refused, so did the attack!