शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार

By योगेश पांडे | Updated: September 22, 2024 23:27 IST

विधानसभा निवडणुकीत विदर्भातून कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री बनतील, अशीच भूमिका कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढील मुख्यमंत्री असेल, असा दावा केला आहे. रविवारी नागपुरात शहरातील सहाही विधानसभा जागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांचा हाच सूर होता. विधानसभा निवडणुकीत विदर्भातून कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील व पटोले हेच मुख्यमंत्री बनतील, अशीच भूमिका कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडली.

रविवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. नितीन राऊत, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते. कुणाल चौधरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत महायुतीचा पराभव करण्याचे आवाहन केले. सद्य:स्थितीत पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा रंगल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांनी लोकसभेत कॉंग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. विधानसभेत ते राज्यात करिष्मा करतीलच. मात्र, विदर्भात सर्वात जास्त जागा जिंकून देतील व तेच मुख्यमंत्री असतील, असा विश्वास कॉंग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी व्यक्त केला. अतुल लोंढे, अभिजीत वंजारी, अनिस अहमद यांनी हा मुद्दा मांडला व नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांनीदेखील याला दुजोरा दिला. दरम्यान, अद्याप महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नसला, तरी नागपुरातील सहाही जागांवर कॉंग्रेसचेच उमेदवार लढतील, असादेखील नेत्यांचा सूर होता. अतुल कोटेचा यांनी यावेळी स्वागत भाषण केले.संथ काम करणाऱ्यांचा होणार हिशेबविकास ठाकरे यांनी यावेळी लोकसभेत संथ काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाहीर इशाराच दिला. लोकसभेत कॉंग्रेसला चांगली मते मिळाली. परंतु, काही पदाधिकाऱ्यांचे काम फारच संथ झाले होते. त्यांची यादीच पक्षाने तयार केली आहे. विधानसभेतदेखील त्यांनी संथपणा दाखविला, तर मनपाच्या निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, असे ठाकरे म्हणाले.पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार२०१९ साली निवडणूक लढलेले पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके व गिरीश पांडव यांनी यावेळी त्यांची भूमिका मांडली. ते तिकिटासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहू व त्यांना जिंकून आणू, असे आम्ही आश्वस्त करतो, असे तिघांनीही प्रतिपादन केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस