शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: मंत्रिमंडळाचा विस्तार असंवैधानिक; शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, नाना पटोलेंचं भाकित

By अभिनय खोपडे | Updated: August 9, 2022 18:51 IST

Nana Patole: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.

- अभिनय खोपडे वर्धा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाकडे बोट दाखवत राज्यपालांनी एक वर्षापर्यंत विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिला नाही. विचारणा केल्यावर असंवैधानिकतेचे कारण पुढे करण्यात आले. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच अध्यक्षाची निवड होत आज मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून त्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रमणा यांनीही दुजोराच दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले हे राज्यासाठी दुदैवच आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आपण म्हणत आहात, मग मंत्रीमंडळाचा विस्तार हा असंवैधानिक का असा प्रश्न विचारला असता आज मंत्रीमंडळाचा झालेला विस्तारही असंवैधानिक असल्याचे नाना पटोले यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. मंत्रीमंळाचा विस्तार झाला खरा पण मंत्री मंडळात किती महिलांना मंत्री म्हणून संधी मिळाली हे बघणे आज गरजेचेच असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारूलता टोकस, माजी पालकमंत्री आ. सुनील केदार, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे, अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे, जिया पटेल, अमर वऱ्हाडे आदींची उपस्थिती होती.

 भाजपची उलटगिणती सुरूबिहार राज्यात नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला आहे. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या उलटगिणतीची सुरूवात आहे. जीवनावश्यक विविध वस्तू आणि शेतमालावर जीएसटी लावून आम्ही किती महसूल गोळा केला आणि करणार याचा गाजावाजा केला जात आहे. पण सरकार पैसे किंवा नफा कमविण्यासाठी नसतेच. शिवाय जनतेला आधार देण्यासाठी असते हे वास्तव आहे. जीएसटीच्या नावावर जनतेच्या खिशातून पैसा तर कर्जाच्या नावावर विदेशातून कर्ज काढले जात आहे. पण पैसा जातो कुठे असा प्रश्न याप्रसंगी नाना पटोले यांनी उपस्थित केला.बॉक्स

चित्रफितून मांडले ईडीच्या भीतीचे वास्तवभाजपच्या विरोधात बोलल्यास ईडीचा ससेमीरा लागेल किंवा लावला जाईल अशी भीती सध्या सर्वसामान्यांमध्ये आहे. भाजपच्या विरोधात बोलल्यास किंवा विरोध केल्यास अडचणीत भर पडेल याबाबत सध्या सर्वसामान्यही बोलके होत असल्याचे उदाहरण नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या चित्रफित पत्रकार परिषदेदरम्यान दाखवून सर्वसामान्यांच्या मनातील ईडीच्या भीतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा