शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: "केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 11:29 IST

Nana Patole: "राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, पण महाराष्ट्र शासन त्यासाठी समर्थ आहे."

मुंबई: 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. कालच्या सभेत राज यांनी सरकारला 3 ता तारखेचा अल्टीमेटम दिला असून, त्यानंतर मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसने टोला लगावला आहे.

'राज आणि देवेंद्र सारखेच'नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले, त्याच पद्धतीचे राज ठाकरेंनी भाषण केले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही," असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

'भाजपकडून मनसेचा वापर'ते पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपने हे सर्व सुरू केले आहे. राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही.'' राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, त्यावर बोलताना पटोले म्हणतात, "चार तरखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. पण, त्यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल." 

'महाराष्ट्राचा तमाशा थांबवा'ते पुढे बोलताना म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा इशारा कुठेही कामात येणार नाही. त्यांनी सुरु केलेला धार्मिक वाद बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हा वाद योग्य नाही, काँग्रेस धार्मिक वादात पडू इच्छित नाही. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNana Patoleनाना पटोलेMNSमनसेcongressकाँग्रेसBJPभाजपा