शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चोंबडेपणा बंद करा! नाना पटोले स्पष्टच बोलले, संजय राऊतांना बोचऱ्या शब्दात सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:32 IST

"संजय राऊत हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर हे लांछन लावणे म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासरखे आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्यासंदर्भात घोषणा केली. यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यातच, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी, त्यांनी काँग्रेसचे उदारहण देताना, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, पण निर्णय राहुल गांधीच घेतात, असे वक्तव्य केले होते. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचऱ्या शब्दात राऊतांना सुनावले आहे. ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. परवा अजित दादांनीही तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात फार काही चोंबडेगिरी करू नका," असे पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले, "संजय राऊत हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर हे लांछन लावणे म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासरखे आहे.  गांधी कुटुंब हे त्याग करणारे कुटंब आहे. पंतप्रधान पदासारखे पद त्या कुटुंबाने सोडले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पद राहुल गांधी यांनी सोडले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार आणि खासदार राहिले आहेत. ते ब्लॉक अध्यक्षापासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे."  एवढेच नाही, तर "मल्लिकार्जून खरगे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे आणि गांधी कुटुंबावर चुकीचा आरोप करणे, ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. हे चुकीचे होईल. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचे प्रवक्ते होता. परवा अजित दादांनीही तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात फार काही चोंबडेगिरी करू नका, एवढाच आमचा सल्ला त्यांना आहे, असे काँग्रेस प्रेदेशाधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस