कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:24 IST2017-12-15T19:22:26+5:302017-12-15T19:24:41+5:30
म्हापसा : कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी यांनी लिलावाद्वारे हा व्हिला विकत घेतला होता.

कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ नामकरण
ऑनलाईन लोकमत
म्हापसा : कांदोळी येथील किंगफिशर व्हिलाचे ‘किग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी यांनी लिलावाद्वारे हा व्हिला विकत घेतला होता.
आठ महिन्यांपूर्वी जोशी यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा किंगफिशर व्हिला ७३.०१ कोटी रुपयांच्या लिलावातून खरेदी केला होता. हा व्हिला ताब्यात घेतल्यानंतर त्यात काही फेरबदल करून या व्हिलाचे ‘किंग्ज मॅन्शन’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण अभिनेते सचिन जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी (१५ रोजी) करण्यात आले. या व्हिलात काही महत्त्वाचे फेरबदल करण्याचे काम सुरू असल्याचे जोशी म्हणाले. त्यात स्विझरलॅन्ड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पा सुविधा सुरू करण्यात येणार असून सुमारे चार सल्लागारांकडून त्याचा वास्तू शास्त्रानुसार आराखडा करण्याचे काम सुरू आहे. हे काम सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.