शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:35 IST

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

"शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर म्हणू द्यात. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही. आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो", असं राजेश टोपे म्हणाले. 

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर बोलतात पण मला वाटत नाही की आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि इतरही प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं संभाजीनगर!राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजी बीकेसी येथील जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर असं नामांतराची गरजच काय? असं विधान केलं होतं.  त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत औरंगाबादचं नामांतर आता भाजपाची सत्ता आल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. यारुन त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायमचा झाला कचरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे