नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 06:46 IST2017-08-05T04:00:35+5:302017-08-05T06:46:19+5:30

नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या.

Nalasopa, the murder of his wife, suspicion of immoral relations; The five-year-old daughter explained | नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा

नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा

वसई : नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. अजयने आपल्या तीन मुलांच्या समोरच सरोजची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
नालासोपारा पूर्वेकडील शर्मावाडी येथील संजय यादव चाळीतील एका खोलीत अजय यादवने (३०) गुरुवारी रात्री आपली पत्नी सरोज यादवची (२८) अतिशय अमानुषपणे हत्या केली. अजयचा आपली पत्नी सरोजचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातूनच अजयने गुरुवारी रात्री सरोजची गळा चिरून हत्या केली.आणि तिच्या शरीराचे तुकडे केले.
आपली पत्नी सरोजची अशी निदर्यपणे हत्या केल्यानंतर अजय आपली मुले प्रयनसु यादव (१०), प्रयनसी यादव (५) आणि हिमांशी यादव (३) यांना घेऊन कामण येथील आपले वडील राम जीवन यादव यांच्या घरी गेला.
त्याठिकाणी अजय जेऊन झोपी गेल्यानंतर त्याची पाच वर्षांची मुलगी प्रयनसीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे सांगितले.
त्यामुळे घाबरलेल्या राम जीवन यादव यांनी थेट अजयचे घर गाठले. त्याठिकाणी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता आत सरोजचा मृतदेह दिसून आला. राम जीवन यांनी लगेचच तुळींज पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सरोजचा खून केल्याप्रकरणी अजयला लगेचच अटक केली. एका पाच वर्षाच्या मुलीमुळे तिच्या आईच्या हत्याकांडाचा काही तासातच उलगडा झाला.

Web Title: Nalasopa, the murder of his wife, suspicion of immoral relations; The five-year-old daughter explained