मुंबईतील तरुणीवर नालासोपा-यात सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: September 11, 2015 11:48 IST2015-09-11T11:45:25+5:302015-09-11T11:48:17+5:30

वांद्रे टर्मिनसवरुन रिक्षेने घाटकोपरला जायला निघालेल्या २० वर्षाच्या तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nalasopa-gang rape in Mumbai | मुंबईतील तरुणीवर नालासोपा-यात सामूहिक बलात्कार

मुंबईतील तरुणीवर नालासोपा-यात सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमत 

नालासोपारा, दि. ११ - वांद्रे टर्मिनसवरुन रिक्षेने घाटकोपरला जायला निघालेल्या २० वर्षाच्या तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत तरुणी ही घाटकोपरची असून नालासोपारा येथील निर्जनस्थळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

९ सप्टेंबररोजी घाटकोपर येथे राहणारी तरुणी सुरतवरुन वांद्रे टर्मिनसला आली होती. यानंतर घाटकोपरला जाण्यासाठी तिने रिक्षाही पकडली. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा घाटकोपरच्या दिशेने न नेता नालासोपाराच्या दिशेने नेली. यानंतर अज्ञात नराधमांनी रिक्षेचा पाठलाग सुरु केला. काही वेळाने त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षेतून हिसकावून लावले व तरुणीला नालासोपारा येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे वृत्त आहे. निर्मलनगर पोलिस ठाण्यात पिडीत तरुणीने शुक्रवारी सकाळी तक्रार दाखल केली आहे.  

 

Web Title: Nalasopa-gang rape in Mumbai