नालेसफाईत सिडको प्रशासन ठरले फोल

By Admin | Updated: June 29, 2016 02:24 IST2016-06-29T02:24:17+5:302016-06-29T02:24:17+5:30

सिडको वसाहतीत नालेसफाईला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत.

Nalasheed being a CIDCO administration fol | नालेसफाईत सिडको प्रशासन ठरले फोल

नालेसफाईत सिडको प्रशासन ठरले फोल


कळंबोली : सिडको वसाहतीत नालेसफाईला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. ठेकेदाराकडून केवळ चेंबरमधील गाळ काढण्यात आल्याने पहिल्याच पावसात सिडकोचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. तुलनेने पनवेल नगरपालिका क्षेत्रात चांगल्या पध्दतीने नालेसफाईची कामे झाल्याने कुठेही पाणी साचलेले नाही.
खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये जवळपास ५० कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नाले आहेत. पावसाळी नाल्यांची जोडणी होल्डिंग पाँडला करण्यात आली आहे. मात्र नाल्यांमध्ये माती, कचरा, प्लॅस्टिक जात असल्याने पाणी तुंबते. हीच परिस्थिती कळंबोली वसाहतीची असून २५ ते ३० किमी लांबीचे पावसाळी नाले या ठिकाणी आहेत. २६ जुलै २००५ साली नाले तुंबल्यामुळे या भागात पाणी भरल्याने मोठी हानी झाली होती. तेव्हापासून सिडकोकडून दरवर्षी नालेसफाईची कामे केली जातात. यंदा नवीन पनवेल, खांदा वसाहत व कळंबोलीत नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली. कळंबोलीत सेक्टर-१४ व १५ मध्ये केवळ चेंबर्समधील गाळ काढण्यात आला. नवीन पनवेलमध्येही अनेक ठिकाणी अशीच कामे झाली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने पहिल्याच पावसात कित्येक ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी सिडको वसाहतीत साचले होते. पनवेल नगरपालिकेने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच नालेसफाई सुरूवात केली. पावसाचे पाणी कुठे थांबू नये म्हणून तीन पथके चोवीस तास तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे १२१ मिलीमीटर पाऊस पडूनही पाणी साचले नाही. परंतु सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
पाण्याचा निचरा होत नसल्याने पहिल्याच पावसात कित्येक ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी सिडको वसाहतीत साचले होते. तर काही ठिकाणी आता कामास सुरुवात केली आहे.

Web Title: Nalasheed being a CIDCO administration fol