नागपूरात सेमिनरी हिल्स जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 22:42 IST2017-04-20T22:42:30+5:302017-04-20T22:42:30+5:30

येथील सेमिनरी हिल्स परिसरातील जंगलाला भीषण आग लागली असून या आगीचा फटका अनेक झाडांना बसला आहे.

Nagpurat Seminary Hills Jhalala fire | नागपूरात सेमिनरी हिल्स जंगलाला आग

नागपूरात सेमिनरी हिल्स जंगलाला आग

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - येथील सेमिनरी हिल्स परिसरातील जंगलाला भीषण आग लागली असून या आगीचा फटका अनेक झाडांना बसला आहे. 
सेमिनरी हिल्स परिसरातील जापनिज गार्डनमध्ये सुरुवातील आग लागली. त्यानंतर आगीचे लोळ पसरत एसएफएस कॉलेजपर्यंत पोहचले. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या आगीमुळे जंगलातील अनेक वर्षांपासून असलेल्या झाडांसह वन्यजीव प्राण्यांचा याचा फटका बसला आहे. 
या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्नीशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. तसेच, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Web Title: Nagpurat Seminary Hills Jhalala fire