नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ होणार - - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 21:29 IST2016-08-20T21:27:02+5:302016-08-20T21:29:25+5:30
विमानासाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ होणार - - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - एअर इंडियाचा एमआरओ, लवकरच सुरू होणारा इंदमारचा एमआरओ, ‘ताल’ची बोर्इंग विमानांसाठी फ्लोअर बीमची निर्मिती या उपलब्धीसह नागपुरात विमान क्षेत्रासाठी जास्त क्षमता आहे. विमानासाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
मिहानमधील टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनतर्फे ड्रीमलायनर ७८७-८ आणि १० बोर्इंग विमानांसाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बीमच्या पुरवठ्यासंदर्भातील कन्साईनमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाºया सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
या समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी जागतिक निविदा बोलविल्या असून २८ आॅगस्टला उघडण्यात येणार आहे. कार्गो हबमुळे मालवाहतूक वाढेल आणि ‘ताल’सह इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पाठविणे सोयीचे होईल, अस मुख्यमंत्री म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, मिहानमध्ये सी-प्लेनच्या निर्मितीसोबतच संरक्षण उत्पादनाला सुरुवात करावी. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येईल.