शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
3
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
4
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
5
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
6
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
7
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
8
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
9
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
10
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
11
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
12
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
13
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
14
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
15
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
16
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
17
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
18
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
19
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
20
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:47 IST

Nagpur South Assembly Election 2024: नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. 

कमलेश वानखेडे, नागपूर Maharashtra Election 2024: २०१९ च्या निवडणुकीत फक्त चार हजारांवर निकाल लागलेल्या दक्षिण नागपूर मतदारसंघात पुन्हा एकदा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जुनेच सरदार लढाईच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा गिरीश पांडव यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील उजवे हात समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू त्यामुळे दक्षिणच्या राजकीय महाभारतात मते व पांडव यांच्यात काट्याची लढाई होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघावर भाजपचा दबदबा राहिला आहे.

कोहळेंचे कापले तिकीट, मतेंना संधी

२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर कोहळे जायंट किलर ठरले. त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सतीश चतुर्वेदी यांना तब्बल ४३ हजार २१४ मतांनी मात दिली. पण २०१९ मध्ये भाजपने कोहळे यांचे तिकीट कापले व मोहन मते यांच्यावर विश्वास दाखविला. 

काँग्रेसने गिरीश पांडव यांना उतरविले. त्यांना नाराज कोहळे समर्थकांची पडद्यामागून साथ मिळाली. प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, सतीश होले या आघाडीच्या नेत्यांच्या बंडखोरीनंतरही 'टफ' फाईट झाली. मते हे फक्त ४०१३ मतांनी विजयी झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी यांना २९ हजार ७१२ मतांची आघाडी मिळाली.

कोहळे समर्थकांची नाराजी थोपवण्याचे प्रयत्न

आता अखेरच्या क्षणी। भाजपने मास्टर कार्ड खेळत सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपुरात उमेदवारी दिली व कोहळे समर्थकांची नाराजी शमविण्याचा प्रयत्न केला. आघाडीत शिवसेनेच्या कोट्यात जात असलेली जागा कायम राखण्यसाठी काँग्रेस नेत्यांनीही मुंबई-दिल्लीत झुंज दिली. 

शेवटी पुन्हा एकदा गिरीश पांडव यांनाच गेल्या वेळची उरलेली लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेससह मित्रपक्षातूनही कुणी बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असल्याचे चित्र आहे.

बसपा व वंचितचा प्रभाव किती? 

२०१४ मध्ये बसपाच्या सत्यभामा लोखंडे यांनी २३ हजार १५६ मते घेतली होती. या वेळी लोखंडे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. बसपाने संजय सोमकुवर यांना हत्तीवर स्वार केले आहे. २०१९ मध्ये बसपाचे शंकर थूल यांना ५६६८ तर वंचितचे रमेश पिसे यांना ५५८३ मते मिळाली होती. लोकसभेतही बसपाचे योगीराज लांजेवार यांना फक्त २८७२ मते मिळाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-south-acनागपूर दक्षिणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी