शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Video: जिनं अमानुषपणे चिमुकल्याला केली होती मारहाण; ‘त्या’ निर्दयी आईला मनसेच्या महिलांनी बदडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:49 IST

मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती

ठळक मुद्देमनसेच्या नागपूरमधील महिला पदाधिकाऱ्यांनी या आईचा शोध घेऊन तिच्या घरीच धडक दिली. सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडलं आणि नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला. चिमुकल्याला मारहाण करत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता

नागपूर – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओ एक निर्दयी आईला स्वत:च्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट झाल्यापासून ज्यांनी ज्यांनी व्हिडीओ पाहिला त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अखेर या क्रूर आईला मनसेच्या महिलांनी धडा शिकवला आहे.

मनसेच्यानागपूरमधील महिला पदाधिकाऱ्यांनी या आईचा शोध घेऊन तिच्या घरीच धडक दिली. यात महिला शहराध्यक्ष मनिषा पापडकर, सचिव स्वाती जैस्वाल, अचला मेसन यांनी या महिलेचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडलं आणि नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला. मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती.

काय होतं प्रकरण?

सासुसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या बाळावर औषध उपचार केले होते. तिचा पती ढोलताशा पथकात काम करतो. तिला एक सहा महिन्याचे गोंडस बाळ आहे. घरगुती वादातून तिचे सासूशी अजिबात पटत नाही. या पार्श्वभूमीवर, २४ मे रोजी तिचा सासु सोबत घरात वाद सुरू झाला. सासू-सुनेचे तोंड वाजत असतानाच बेड बसलेल्या महिलेने तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण सुरू केली.

ती त्याला वारंवार गादीवर आपटत होती. या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती. हा व्हिडीओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती काढून लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेऊन डॉक्टर कडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामूळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले होते.

टॅग्स :MNSमनसेnagpurनागपूरPoliceपोलिस