नागपूरमध्ये रिव्हॉल्वर आणि जीवंत काडतूसं जप्त

By Admin | Updated: June 24, 2016 13:37 IST2016-06-24T13:37:19+5:302016-06-24T13:37:53+5:30

नागपूरमध्ये गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका चहाच्या टपरीवरून दोन अग्निशस्त्र आणि ३ जीवंत काडतूसं जप्त केली.

In Nagpur, the revolvers and live cartridges were seized | नागपूरमध्ये रिव्हॉल्वर आणि जीवंत काडतूसं जप्त

नागपूरमध्ये रिव्हॉल्वर आणि जीवंत काडतूसं जप्त

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ -  गणेशपेठ  पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका चहाच्या टपरीवरून दोन अग्निशस्त्र आणि ३ जीवंत काडतूसं जप्त केली. रमेश सदाशिव कृपाल (वय ५९) याच्याकडून ही अग्निशस्त्र जप्त करण्यात आली.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केटच्या नाका नंबर १३ जवळ कृपालची चहा टपरी आहे. तेथे मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र असल्याची माहिती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यावरून शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास तेथे पोलिसांना छापा घातला. चहा टपरीची तपासणी केली असता पोलिसांना एक रिव्हॉल्वर आणि एक देशी कट्टा मिळाला. सोबतच तीन जिवंत काडतूसही आढळली. पोलिसांनी ती जप्त केली.   रमेश कृपाल याला याबाबत माहिती विचारली असता अज्ञात व्यक्ती येथे सकाळी चहा घ्यायला आल्या होत्या. त्यांनी हे रिव्हॉल्वर आणि देशी कट्टा येथे ठेवला आणि निघून गेले, अशी माहिती त्याने दिली. तो असंबंध उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: In Nagpur, the revolvers and live cartridges were seized