शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

टिटवाळ्याजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे घसरले 9 डबे, मुंबईकडे येणा-या गाड्या रखडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:55 IST

मुंबई, दि. 29 -  आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्ती जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला ...

मुंबई, दि. 29 -  आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्ती जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे.  रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकान ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली. 

एक्स्प्रेसच्या इंजिनसह 9 डब्बे रुळावरुन घसरले आहेत.  या अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुदैवानं  या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  मात्र काही प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे वृत्त आहे.  रेल्वे पोलीस,  डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.  

दरम्यान,  दुरांतो एक्स्प्रेसनं मुंबईकडे येणारे आमदार वा. को. गाणार , माजी आमदार डॉ. खुशाल बोभचे आणि आशीष जयस्वाल सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. 

इंजिनशिवाय SLR, H1, A1, A2, A3, B1, B2, B3, B4 हे डबे घसरले आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी होता. तसंच डबे रुळावरुन घसरल्यानंतर काही प्रवासी बर्थवरुन पडून किरकोळ जखमी झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

हेल्पलाईन क्रमांकसीएसटीएम 022-22694040,ठाणे 022-25334840,कल्याण 0251– 2311499,दादर 022-24114836,नागपूर 0712-2564342

लोकल विस्कळीत9 डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस,  अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस रखडल्या आहेत.

गाड्यांची स्थितीफिरोजपूर-सीएसएमटी पंजाब मेल इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ रखडलीमनमाड-एलटीटी एक्स्प्रेस आज रद्द

स्टेशन्सवर खोळंबलेल्या रेल्वे गाड्यासेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडला उभीगरीबरथ लासलगावला उभीजनता एक्स्प्रेस अस्वली स्टेशनला उभीपंचवटी एक्स्प्रेस घोटीला तर पंजाब मेल इगतपुरीत थांबून आहे

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात