शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Nagar Panchayat Election Result 2022: आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर! नगरपंचायतीत काँग्रेसला फटका; १०० जागा घटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 11:20 IST

Nagar Panchayat Election Result 2022: काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या

- अतुल कुलकर्णीमुंबई : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. मागील जागांच्या तुलनेत काँग्रेसच्या १०० जागा घटल्याचे अंतिम निकालात स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या आहेत.राज्यात यावर्षी पाली,  देहू, महाळूंग-श्रीपूर, वैराग, नातेपुते आणि तीर्थपुरी अशा सहा नगरपंचायत नव्याने निर्माण करण्यात आल्या. त्या ठिकाणी प्रथमच मतदान झाले. राहिलेल्या १०० नगरपंचायत जुन्याच होत्या. २०१४ ते २०१६ मध्ये तेथे निवडणुका झाल्या होत्या. यापूर्वीचे संख्याबळ बघितल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी ज्या काळात सत्तेत नव्हती त्यावेळी त्यांना यश मिळाले होते. मात्र आता सत्ता मिळूनही काँग्रेसला मागच्या जागा टिकवता आल्या नाहीत.  काँग्रेसने स्वबळाची भाषा सुरुवातीपासून लावून धरली होती. निकालानंतरही माजी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याचे समर्थनच केले. आज जरी आमचे नुकसान झाले असले तरी भविष्यात त्याचा राजकीय फायदाच होईल, असेही ते म्हणाले. मात्र  प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले यांनी सतत केलेली वादग्रस्त विधाने पक्षालाच अडचणीची ठरली. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती आणि नाही. जबाबदारी घेण्याची तयारीही नाही. काँग्रेसचा एक मोठा वर्ग ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या विचाराचा होता. पण स्वबळाच्या सततच्या घोषणा आणि त्यावरून आघाडीत होणारी नाराजी यामुळे तोही वर्ग फारसा सक्रिय झाला नाही. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी आपापले जिल्हे सांभाळले. त्यामुळे काँग्रेसची पडझड थांबवण्यास मदत झाली. अन्यथा काँग्रेसला आणखी मोठा फटका बसला असता. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती तशीच स्थिती महाविकास आघाडीमध्येही होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तो काही कारणाने मान्य होऊ शकला नाही, असे स्वत: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. पण आघाडी का झाली नाही हे त्यांनी सोयीस्कररीत्या सांगण्याचे टाळले. याच बिघाडीचा फायदा भाजपने उचलला. गेल्या वेळेच्या तुलनेत तब्बल ७४ जागा जास्तीच्या मिळवल्या. शिवसेनेच्या मदतीला उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आली. शिवसेनेत जरी सुंदोपसुंदी असली तरी ती बाहेर आली नाही. त्याचा फायदा शिवसेनेला तब्बल ९४ जागा जास्तीच्या मिळवता आल्या. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याचाही फायदा सेनेला झाला.  पण तिघांनी एकत्रित निवडणूक लढविली असती तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी चांगले वातावरण तयार झाले असते. भाजपच्याही जागा कमी करता आल्या असत्या. पण ही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घालवली.पक्ष      २०१४-१६    २०२१     (-/+)काँग्रेस     ४४५     ३४४    - १००भाजप     ३४५     ४१९       +७४राष्ट्रवादी      ३३६     ३८१    +४५शिवसेना    २०४     २९६     +९२इतर     ३७२     ३५१    - २१

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस