भिवंडीत सहा वर्षीय चिमुरडीवर नरधमाचा बलात्कार

By Admin | Updated: April 18, 2017 22:02 IST2017-04-18T22:02:50+5:302017-04-18T22:02:50+5:30

सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने अमानुष बलात्कार केल्याची संतापजनक घटना

Nadhmacha raped by a six-year-old girl on fire | भिवंडीत सहा वर्षीय चिमुरडीवर नरधमाचा बलात्कार

भिवंडीत सहा वर्षीय चिमुरडीवर नरधमाचा बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
ठाणे,दि.18 - भिवंडीत खून ,बलात्कार ,दरोडे ,चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटनांनी कळस गाठलेला असतानाच कामतघर शिवरामनगर  येथे एका सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने अमानुष बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.  मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मिठाईलाल प्रजापती ( 45 ) असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.
 
मिठाईलाल याचे पत्नी व मुले मुळगांवी गेल्याने तो एकटाच घरी होता.ही संधी साधून त्याने चाळीतील शेजारच्या सहा वर्षीय बालिकेला खाऊचे अमिश दाखवून घरात बोलावले व तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घडलेली घटना आईला सांगितली असता अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच अत्याचारी मिठाईलाल यास तत्काळ ताब्यात घेवून गजाआड केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे करीत आहे. 
 

Web Title: Nadhmacha raped by a six-year-old girl on fire