कालपरवापर्यंत अजित पवारांवर वेगवेगळ्या प्रकरणावरून तुटून पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांच्या निधनाने शोकात बुडाल्या आहेत. "अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले", असे म्हणत शोक व्यक्त करणाऱ्या अंजली दमानियांनी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर एक भावनिक पोस्ट केली आहे. मोठा काळ मी त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे, असे म्हणत दमानिया भावूक झाल्या.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी अनेक प्रकरणांमध्ये अजित पवारांवर टीका केली. अगदी काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या पार्थ पवारांच्या कंपनीकडून झालेल्या जमीन खरेदी प्रकरणावरून त्यांना आक्रमक झाल्या होत्या. पण, २८ जानेवारी रोजी अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर दमानियांना दुःख आवरता आले नाही.
"जिवापाड लढले, जन्मभर लढले असते"
"विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही", असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
दमानिया म्हणाल्या, मृत्युसमोर सर्व वाद थांबतात
अजित पवारांवर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दमानियांनी एक पोस्ट शेअर करत आपल्याला भावना व्यक्त केल्या आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, "अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. काल त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे."
"मतभेद तीव्र होते, पण मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण विचार करण्याचा आहे. लोकशाही, मूल्ये आणि संघर्ष यांचा. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो", अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले.
विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना गेला तोल
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला पोहोचणार होते. पण, व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला.
...तर विमान अपघात टळला असता, एक चूक महागात
बारामती विमानतळ हा नियमित किंवा विमान वाहतूक क्षेत्राच्या भाषेत 'शेड्युल विमानसेवा' म्हणतात (मोठी विमाने) त्यासाठी वापरला जात नाही; कारण तशा सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. विशेषतः इथे रात्री विमान उतरण्याची सोय नाही.
रात्री विमान उतरण्याची सोय ज्या विमानतळावर असते, तिथे धावपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर लाइट लावलेले असतात. हे लाइट केवळ रात्रीच कामाला येतात असे नाही; तर ज्यावेळी दृश्यमानता कमी असते त्यावेळीही या लाइटच्या साहाय्याने वैमानिकाला विमान उतरण्यास मोठी मदत होते. जर अशी सुविधा बारामती विमानतळावर असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती.
Web Summary : Activist Anjali Damania mourns Ajit Pawar's death, ending their long-standing ideological battle. Despite intense disagreements, she acknowledged that death brings closure. She expressed shock and sadness over his sudden demise, reflecting on their past conflicts.
Web Summary : अंजली दमानिया ने अजित पवार के निधन पर शोक व्यक्त किया, जिससे उनका वैचारिक संघर्ष समाप्त हो गया। तीव्र मतभेदों के बावजूद, उन्होंने स्वीकार किया कि मृत्यु सब कुछ समाप्त कर देती है। उन्होंने उनकी आकस्मिक मृत्यु पर दुख व्यक्त किया।