माझी योजना : आदर्श गाव योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:05 IST2018-10-12T12:03:13+5:302018-10-12T12:05:00+5:30
गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.

माझी योजना : आदर्श गाव योजना
पाणलोट विकास (गाभा कामे), गावनिहाय (बिगरगाभा कामे), कृषी विकासकामे, पर्यावरण संवर्धन, उपजीविकेचे उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय, पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.
या अंतर्गत प्रकल्प कालावधी ३ वर्षांचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत प्रकल्प कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढविण्याचे अधिकार कार्यकारी समितीस असतो. प्रकल्प राबविताना प्रत्येक प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण जी कामे पूर्ण होतात, ती कामे संबंधित शासकीय यंत्रणा किंवा ग्रामपंचाायतीला हस्तांतरित केली जातात, कमीत कमी ५ गावे याप्रमाणे प्राधान्य दिले जाते. प्रत्येक पंचवार्षिक कालावधीत १०० नवीन गाव निवडीचे लक्ष्यांक दिला जातो. या योजनेंतर्गत नव्याने निवड करण्यात येणाऱ्या गावांपैकी २५ टक्के गावांचे प्रस्ताव जलसंधारणाच्या विविध विभागांमार्फत घेता येतात.