अभियांत्रिकीचे परत येरे माझ्या मागल्या

By Admin | Updated: July 4, 2014 01:11 IST2014-07-04T01:11:44+5:302014-07-04T01:11:44+5:30

एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या केवळ ७० टक्के अर्ज आल्यामुळे यंदा

My return to engineering back | अभियांत्रिकीचे परत येरे माझ्या मागल्या

अभियांत्रिकीचे परत येरे माझ्या मागल्या

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : केवळ ७० टक्के अर्जच दाखल
नागपूर : एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या केवळ ७० टक्के अर्ज आल्यामुळे यंदा रिक्त जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ न केल्यामुळे महाविद्यालयांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील अर्ज दाखल करण्यातच विद्यार्थ्यांचा निरुत्साह दिसून आला आहे हे विशेष. गुरुवारी अभियांत्रिकी शाखेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. अखेरच्या दिवशी १,२७७ अर्ज दाखल करण्यात आले. मात्र यामुळे नागपूर विभागात उपलब्ध जागांच्या एकूण ७०.४९ टक्केच म्हणजे १७,१९६ अर्ज दाखल होऊन त्यांची पडताळणी झाली.
यातीलही अनेक विद्यार्थी इतर विभागांतील महाविद्यालयांत किंवा इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका आहे. यात सगळ््यात मोठा दबाव महाविद्यालय प्रशासनावर आला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा असताना असे काहीही न झाल्यामुळे महाविद्यालयांना जागा भरण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे हे निश्चित. (प्रतिनिधी)

Web Title: My return to engineering back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.