शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 6:59 PM

Nilesh Lanke vs Sujay Vikhe Property: निलेश लंके यांची थेट लढत ही सुजय़ विखे पाटील यांच्यासोबत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपत्ती किती ते जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार निलेश लंकेंनी कोरोना काळात लोकांवर वैद्यकीय उपचार करून राज्यात प्रसिद्धी मिळविली होती. राष्ट्रवादीची दोन शकले झालेली असताना लंकेंनी अजित पवारांच्या गटात उडी मारली होती. परंतु जेव्हा लोकसभेची वेळ आली तेव्हा लंके आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आले आणि अहमदनगरचे उमेदवारही झाले. या लंकेंनी आज उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये संपत्ती जाहीर केली आहे. 

निलेश लंके यांची थेट लढत ही सुजय़ विखे पाटील यांच्यासोबत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपत्ती किती ते जाहीर केले आहे. निलेश लंके यांची इथे प्रॉपर्टी आहे, तिथे प्रॉपर्टी आहे असे अनेकदा आरोप झाले होते. यावर लंके यांनी मी समाजासाठी काम करतो, माझी प्रॉपर्टी दाखवा मी उमेदवारी अर्ज देखील भरणार नाही, असेही सांगितले होते, असे म्हटले आहे. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो, मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे हाच उद्देश ठेवून मी काम करतो आहे, असे ते म्हणाले. 

लंके यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार संपत्तीच्या तुलनेत त्यांच्यावर कर्ज जास्त आहे. लंके यांनी ४४ लाख ३२ हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर त्यांच्यावर ३७ लाख ४८ हजार रुपयांचे कर्जही आहे. आमदार लंके यांच्याकडे २० हजारांचे शेअर्स आहेत. निलेश लंके यांची संपत्ती २९ लाखांनी घटली आहे. 

तर दुसरीकडे सुजय विखे यांच्या संपत्तीच २०१९ पेक्षा वाढ झाली आहे. महायुतीचे उमेदवार विखे यांच्याकडे २०१९ मध्ये १६ कोटी ८६ लाखांची संपत्ती होती. सध्या त्यांच्याकडे २९ कोटी १८ लाख एवढी संपत्ती आहे. तशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेSujay Vikheसुजय विखेahmednagar-pcअहमदनगरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४