शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, ९२ टक्के मिळवूनही माझे कुठे चुकले?

By admin | Updated: June 10, 2015 02:03 IST

दहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले.

डॉक्टर दाम्पत्याचे अपेक्षांचे ओझे : मुलीने व्यक्त केली मानसोपचार तज्ज्ञाकडे उद्विग्नताप्रशांत तेलवाडकर, औरंगाबाददहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले. यानंतरही तुमच्या मनासारखे झाले नसेल तर, आई-बाबा मी काय जीव देऊ? अशा शब्दांत औरंगाबादेतील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीने आपली उद्विग्नता मानसोपचार तज्ज्ञाकडे व्यक्त केली़ अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळविल्याचे दु:ख या डॉक्टर दाम्पत्याला बोचत होते. निकालानंतर आई-वडील आणि मुलगी यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचे मोफत मार्गदर्शन केंद्र गाठले.९२ टक्के गुण मिळविल्यानंतरही रडून रडून मुलीचे डोळे लाल झाले होते. निकालावर नाराज झालेले वडील म्हणाले की, डॉक्टर, मुलीने समाजात माझी मान खाली घातली. मुलगी ९५ किंवा ९६ टक्के गुण मिळविल, अशी अपेक्षा होती, पण पडले ९२ टक्के. मूर्ख मुलीने पेपर सोडविताना वडिलांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करायला पाहिजे होता. वडिलांचे बोलणे थांबवत आई म्हणाली, हिच्यासाठी काय केले नाही आम्ही? गाडी घेतली. मोबाइल घेऊन दिला. मात्र, मुलीने आमचे नाव घालविले. अहो, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या नर्सच्या मुलाला ९४ टक्के गुण मिळाले. आता तिला कोणत्या तोंडाने सांगू की, माझ्या मुलीने ९२ टक्के गुण मिळविले. आई-वडिलांचे हे संवाद ऐकल्यानंतर डॉ. शिसोदे यांनी मुलीशी एकांतात चर्चा केली. ती म्हणाली की, डॉक्टर खरे सांगते की, मी ९५ टक्के मिळविण्यासाठी १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. आणखी ३ ते ४ टक्के गुण मिळविण्यासाठी मी काय जीव देऊ? आई-बाबांच्या वागण्याने माझा आत्मविश्वास ढासळला आहे, यापुढे शिकायचेच नाही, असे मला वाटू लागले आहे...हे झाले एक उदाहरण. आणखी एका मुलाचा कॉल आला. ‘डॉक्टर मला यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर बनायचे आहे. मात्र, दहावीच्या परीक्षेत ९० टक्केच गुण मिळाले. गुण कमी मिळाल्याने घरातील सर्व जण मला ९० टक्क्यांचा कलेक्टर, असे चिडवत आहेत. मी काय करू?’ डॉ. शिसोदे म्हणाले की, आई-वडिलांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, त्यांची क्षमता ओळखून आपण निर्णय घ्यायचा असतो. आई-वडिलांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा. कारण, दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील अंतिम सत्य नव्हे.हेल्पलाइनवर ८३ जणांनी केले कॉल विद्यार्थ्यांसाठी डॉ. संदीप शिसोदे यांनी मोफत हेल्पलाइन सुरू केली आहे. अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळाल्याने सोमवारी दिवसभरात ८३ कॉल आले. प्रत्यक्षात १४ पालक व पाल्य त्यांना भेटून गेले. यात कमी गुण मिळाले म्हणून नाराज झालेल्यांचे फोन अधिक होते.