‘माझं नाव शिवसेना’
By Admin | Updated: September 2, 2014 01:53 IST2014-09-02T01:53:32+5:302014-09-02T01:53:32+5:30
एक वयोवृद्ध हमाल मोठे ओङो हातगाडीवरून वाहून नेताना त्याला दम लागतो, चढावावर एक पाऊल टाकणोही मुश्किल होऊन जाते.

‘माझं नाव शिवसेना’
मुंबई : एक वयोवृद्ध हमाल मोठे ओङो हातगाडीवरून वाहून नेताना त्याला दम लागतो, चढावावर एक पाऊल टाकणोही मुश्किल होऊन जाते. अशावेळी दोन तरुणी समोर येतात. हातगाडीला आधार देत पुढे नेतात. हमाल विचारतो, मुलींनो तुमचे नाव काय? त्या मुली म्हणतात.. आमचे नाव,.. शिवसेना!!
स्वत: शिवसैनिक असलेल्या उत्साही आणि कल्पक तरुणांनी ही क्लिप बनविली आहे. ती केवळ एक मिनिटाची असली तरी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. 8क् टक्के समाजसेवा आणि 2क् टक्के राजकारण असा दावा करीत वाटचाल करणा:या शिवसेनेचा समाजसेवी चेहरा तरुणाईच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्यात केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ती व्हॉटस्अॅप, फेसबुक, टेलिग्रामच्या माध्यमातून मतदारांर्पयत पोहोचत आहे. शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितले की, अशा लहान लहान क्लिप्स् तयार केल्या जात असून निवडणूक काळात त्या प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरतील. ‘माझं नाव शिवसेना’ असे या मोहिमेचे नाव आहे. सोशल मीडियावरून शिवसेनेने या माध्यमातून प्रचारास सुरुवात केली आहे. (विशेष प्रतिनिधी)