माई धर्माधिकारी यांचे पुण्यात निधन

By Admin | Updated: April 16, 2015 02:30 IST2015-04-16T02:30:31+5:302015-04-16T02:30:31+5:30

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता (माई) धर्माधिकारी यांचे बुधवारी पहाटे पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या.

My Dharmadhikari passed away in Pune | माई धर्माधिकारी यांचे पुण्यात निधन

माई धर्माधिकारी यांचे पुण्यात निधन

दासभक्त शोकाकुल : रेवदंड्यात करण्यात आले अंत्यसंस्कार
रेवदंडा/अलिबाग : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता (माई) धर्माधिकारी यांचे बुधवारी पहाटे पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या.
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्यभरातून दासभक्त रेवदंडा येथील मारुती आळीतील घराकडे वळले. बुधवारी सकाळपासूनच रेवदंडा तसेच माथेरान बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. दुपारी शोकाकुल वातावरणात रेवदंड्यातील हरेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर ज्येष्ठ चिरंजीव उमेश धर्माधिकारी यांनी अंत्यसंस्कार केले.

Web Title: My Dharmadhikari passed away in Pune