माझा मतदारसंघ ‘कऱ्हाड दक्षिण’च

By Admin | Updated: September 15, 2014 04:32 IST2014-09-15T04:32:55+5:302014-09-15T04:32:55+5:30

मला सेफ मतदारसंघ सापडत नाही या विरोधकांनी उठविलेल्या वावड्या आहेत. माझी उमेदवारी केंद्रीय समितीच नंतर जाहीर करेल;

My constituency is Karhad South | माझा मतदारसंघ ‘कऱ्हाड दक्षिण’च

माझा मतदारसंघ ‘कऱ्हाड दक्षिण’च

कऱ्हाड : मला सेफ मतदारसंघ सापडत नाही या विरोधकांनी उठविलेल्या वावड्या आहेत. माझी उमेदवारी केंद्रीय समितीच नंतर जाहीर करेल; पण माझा मतदारसंघ कऱ्हाड दक्षिणच आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. तर दुसरीकडे, कऱ्हाड दक्षिणमधून काँग्रेसने उमेदवारी नाकारली तरी आपण रिंगणात उतरणार असल्याची घोषणा आमदार विलास पाटील उंडाळकर यांनी नवी मुंबईत केली.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर रविवारी प्रथमच मुख्यमंत्री चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्या वेळी निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल. आमच्या उमेदवार निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आघाडी करीत असताना जागांसाठी थोडी ओढाताण होतच असते; पण त्यामध्ये सन्मानाने तडजोड होईल. कारण दोन्ही काँग्रेसने एकत्रित जावे, अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. काही जागांची अदलाबदल होईल का, याबाबत विचारले असता, अगोदर कोणाला किती जागा, याचा आकडा तरी ठरू द्या. सोमवारी आपण दिल्लीला जात आहोत; मात्र दिल्लीतील बैठक वेगळी आहे आणि सोमवारी यादी जाहीर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्वेक्षणात मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या पसंतीची टक्केवारी वाढत चालली आहे. त्याप्रमाणे जागांची संख्याही वाढत जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: My constituency is Karhad South